
परमहंस रामकृष्ण मौनीबाबा संस्थान चिखली, ता. चिखली, जि. बुलढाणा येथे स्थित आहे. संस्थान भव्य व दिव्य स्वरूपात उभारलेले आहे. प्रवेशद्वारासमोर ६१ फूट उंच दत्त मंदिर व सभामंडप आहे. मंदिर परिसरात गणपती, गरुड, मारोती, लक्ष्मीदेवी, अष्टभुजा, राम-लक्ष्मण-सीता, राधाकृष्ण व विठ्ठल-रुख्मिणी अशी विविध मंदिरे आहेत.
दत्त मंदिराखाली मौनीबाबांचे समाधीस्थळ असून तेथे बाबांची भव्य मूर्ती विराजमान आहे. परिसरात भक्तनिवासाची उत्तम सोय असून गरम पाणी, स्नानगृह व शौचालयांची सुविधा उपलब्ध आहे. ध्यानमंदिर, दुकाने व विवाह सोहळ्यासाठी १३,००० चौ.फुटांचा दोन मजली हॉलही उपलब्ध आहे.
पर्णकुटीत १११ किलो वजनाची अष्टधातूची अभिषेक मूर्ती स्थापन आहे. पौर्णिमेला विशेष पूजा, अभिषेक, होमहवन व महाप्रसाद होतो. दररोज महाप्रसादाचे वितरण केले जाते.
संस्थानचे कामकाज विश्वस्त मंडळामार्फत पारदर्शक पद्धतीने चालते. संस्थानचे पहिले अध्यक्ष श्री. किसनराव भावसार (चिखली) तर विद्यमान अध्यक्ष श्री. संतोषभाऊ देशमुख (शेगांव) आहेत.
मौनीबाबा संस्थान भक्तांच्या सेवेसाठी अखंड कार्यरत आहे.

























.

श्री. संतोष देशमुख

श्री. अरविंद पाठव

श्री. प्रेम राज भाला

श्री. ज्ञानेश्वर शोळंकी

श्री. सुरेश सावजी

डॉ. धीरज नागोरे

श्री. राहुल बोन्द्रे

श्री. जितेंद्र बोन्द्रे

श्री. रणजित सोनाये
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.