परमहंस रामकृष्ण मौनीबाबा बदल
२१ जानेवारी १९०५ साली रामकृष्ण मौनीबाबांचा पौष पौर्णिमा या दिवशी सिरसोली गावात राजपूत वेशात जन्म झाला.
सिरसोली हे गाव अकोला जिल्हयातील अकोट तालुक्यात आहे. मौनीबाबांच्या वडिलांचे नाव आकाराम आणि आईचे नांव रंगाई होते, आकाराम नागोरे आणि रंगाई या मातापित्याने त्यांचे नाव रामकृष्ण ठेवले होते.
लहाणपणापासूनच रामकृष्णाचे सारे लक्ष ईश्वर भक्तीत लागलेले असायचे, मातापित्याने रामकृष्णाचे लग्न करून दिले. त्यांना मुलेही झाली पण त्यांचं लक्ष मात्र संसारात लागत नव्हत, अशातच दत्तजयंतीच्या उत्सवात वयाच्या बत्तीसाव्या वर्षी रामकृष्णाला दत्ताचा साक्षात्कार झाला. दत्तप्रभूने रामदष्णाला तपश्चर्या करण्याची आज्ञा केली, संसाराचा त्याग करून परमेश्वर प्राप्ती करून घेण्याची आज्ञा केली. आणि तेव्हाच सर्वस्वाचा त्याग करून आपल्या जीवनाचे सार्थक करून घेण्यासाठी रामकृष्ण तीर्थयात्रेला निघाले.
बद्रीनाथाच्या साक्षीने मौनव्रत धारण करुन वस्त्राचा याग केला व लंगोटी धारण केली. तिर्थयात्रा केल्यानंतर त्यांची पावलं वळली ती सातपुडा पर्वताकडे. सातपुडा पर्वताचा टेकडीवर त्यांनी दोन वर्ष कठीण तपश्चर्या केली.
अशा कठीण सपः साथने मुळे गुरुदेव त्यांना प्रसन्न झाले व त्यांनी रामकृष्णास उपदेश दिला आणि गळ्यात विजयी माला आशीर्वाद दिला. तिथून पुन्हा ते तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. भारत भ्रमण करीत चार धाम यात्रा करून शेवरी ते चिखलीत आले. तेव्हा हयाच क्षेत्राला त्यांनी आपली कर्मभूमी व तपोभूमी मानून अखंड तपसाधना सुरु केली. काशीनाथ आप्पा बोंद्रे यांच्या मळ्यात, १९४३ साली गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तार अंगावरील लंगोटीचाही त्याग करून नग्न दिगंबर वृत्तीने ते वागू लागले
निंब वृक्षाचा आश्रय घेऊन ते रात्रंदिवस ऊन, पाऊस, थंडी घ्याची तमा न बाळगता ध्येय गाठण्याच्या कार्यास लागले. आपल्या अखंड तपश्चर्येने त्यांनी कृपानिधी प्राप्त करून घेतला त्यांचा तपः सामर्थाने बरेच लोक प्रभावित झाले व ते नियमित बाबांकडे येऊ लागले. कालांतराने त्यांचा भक्तवृंद बराच वाढला. त्यांच्या मौनव्रतामुळे लोक त्यांना मौनीबाबा म्हणून संबोधू लागले. तपाचरण करीत असतांना बाबांनी परमहंस वृत्ती म्हणजे लहान मूलांची वृत्ती धारण केली होती. त्यामुळे परमहंस रामकृष्ण मौनीबाबा या नावाने ते चिखलीत उदयास आले. चिखली येथील श्रीमंत काशीनाथ आप्पा बोंद्रे हे मौनीबाबांचे पहिले भक्त. त्यानंतर मात्र भक्त वर्ष सारखा वाढू लागला. भक्तांना काही अनुभूती बाबांच्या दर्शनामूळे येऊ लागल्या. काही भक्त मंडळींची त्यांना आलेल्या अनुभवावरून श्रद्धा इतक्या पराकोटीला पोहचली की, रात्रंदिवस ते बाबांच्या सेवेत राहू लागले.
काशीनाथ आप्पा बोंद्रे यांनी बाबांना मठ बांधून दिला आणि आपल्या भक्तीने नेहमी करीता बाबांना चिखलीला ठेवून घेतलं.
मौनीबाबांनी बद्रीनाथला मौनव्रत धरले होते आणि तिथे जाऊनच भक्तांच्या विनंतीवरून अठरा वर्षांनी मौनव्रताची समाप्ती केली. मौनव्रत सोडल्यानंतर मौनीबाबा भक्तांना उपदेश करु लागले, बाबांच्या तोंडून निघालेली अमृतवाणी भक्तांना मार्गदर्शक ठरू लागली.
श्रीकृष्णाने सांगितलेले कर्माचे महत्त्व मौनीबाबा नेहमी 'ज्याचे त्याला’ या दोनच शब्दात सांगायचे. 'माझा प्रिय आत्मा जनी जनता जनार्दन’ हे बाबांचं वाक्य होत. बाबांनी सर्व भक्तांवर भरभरून प्रेम केलं. माणसाला माणूस म्हणून शिकवले.
७ जुलै १९९० आषाढ शुद्ध पौर्णिमा (गुरु पौर्णिमा) या दिवशी चिखली येथे बाबांनी देह ठेवला आणि अनंतात विलिन झाले,
चिखली येथे मौनीबाबांचे भव्य दिव्य मंदिर आहे. तिथे योगेश्वर मौनीबाबांची समाधी स्थित आहे.
आजही बाबांच्या दर्शनाचा आणि कृपा प्रसादाचा लाभ घेण्यासाठी असंख्य भक्त चिखली स्थळी येतात. दिवसेंदिवस मौनीबाबांचा भक्त परिवार वाढत आहे, शुभमूर्तीचे दर्शन भाविकांना वेगळाच आध्यात्मिक आनंद प्राप्त करून देते.
अलौकिक अनुभूतीने नटलेले मौनीबाबा दैदिप्यमान हिरा आहेत ‘एक कोहिनूर हिरा’.

We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.